रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक ५ एप्रिलला जाहीर झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून याची घोषणा केली आहे. उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून उदय बने यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे दिला. त्यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदाची निवडणूक जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केली आहे. ही निवडणूक ५ एप्रिलला होणार असून निवडणूक अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी विकास सूर्यवंशी काम पाहणार आहेत. या पदासाठी शिवसेनेने उदय बने यांची उमेदवारी जाहीर केली असून निवड होणे ही केवळ औपचारिकता बाकी आहे. उदय बने यांना उपाध्यक्ष पद देताना त्यांच्याकडील खात्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांच्याकडे बांधकाम व आरोग्य हे खाते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच उपाध्यक्ष यांच्याकडे बांधकाम व आरोग्य खात्याचा पदभार दिला जाणार आहे.