रत्नागिरी:- बेदरकारपणे कार चालवून दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना रविवार 28 एप्रिल रोजी रात्री 12.30 वा.जिल्हा परिषद एसटी स्टॉप समोर घडली होती.
त्या दिवशी रात्री केदार विलास बोरकर (30, रा.घुडेवठार, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-एएम- 5864) वर पाठीमागे निरज चंद्रशेखर चौगुले (30, रा.मांडवी, रत्नागिरी) याला सोबत घेउन जयस्तंभ ते मारुती मंदिर असा जात होता. तो जिल्हा परिषद येथील एसटी स्टॉप समोरील रस्त्यावर आला असता पाठीमागून येणार्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला धडक देत हा अपघात केला. अपघात केल्यानंतर स्विफ्ट चालकाने तिथून पळ काढला. या अपघातात दुचाकीवरील दोघांना दुखापत झाली होती. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279, 337 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (ब) 187 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.