रत्नागिरी:- जिल्हा नियोजनच्या 300 कोटीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून आपत्कालीन यंत्रणेसाठी 703 कोटी मंजूर झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीत मंत्रिमंडळाची बैठक व्हावी यासाठी आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की आपत्कालीन मधून धूपप्रतिबंधक बंधारे, भुमिगत गटारे, शेल्टर हाऊस उभारले जाणार आहेत.
थिबापॅलेस येथे थ्रीडी मल्टीमेडीया प्रेझेंटेशनसाठी 25 कोटी आवश्यक असून त्यासाठी चेन्नईहून विशेष पथक आले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील रिसर्च सेंटर बाबतही महत्ताची चर्चा झाली आहे.
तिवरे धरण फुटीनंतर पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून उर्वरीत पुनर्वसन सिडको मार्फत केले जाणार आहे, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घातले आहे. लवकरच सिडकोमार्फत 26 घरे बांधून दिली जाणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गालगत एमआयडीसीच्या माध्यमातून सुसज्ज रेस्ट हाऊस होणार आहेत. रोहा एमआयडीसीसाठी 16 कोटींचे रेस्ट होणार आहे. सावर्डे येथे 5 कोटी, पाली आणि रत्नागिरी
एमआयडीसी रेस्ट हाऊसचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. रेल्वे स्थानकांना जोडणार रस्ते चकचकीत आणि प्रशस्त करण्यात येणार आहेत. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने ते झाले आहे. रत्नागिरीसाठी 8 कोटी रुपये मिळाले आहेत. सोलर युनिटचा गोळप पावस येथील प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यातुन 19 लाख युनिट आपण महावितरणला देतो. यातुन 80 लाख रुपये मिळणार आहे. ते ग्रामपंचायतींच्या स्ट्रिटलाईच्या बिलाकडे वर्ग केल्यास काही टक्के सवलत मिळणार आहेत. गुहागर मध्ये असा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे स्ट्रिट लाईटच्या बिलात 50 टक्के सवलत मिळणार आहे, असे ना. सामंत यांनी सांगितले.
शिक्षक भरतीबाबत आम्ही धरोणात्मक निर्णय घेतला आहे. जेव्हा शिक्षक भरती होईल, तेव्हा त्याची नोकरी त्या जिल्ह्यातच होईल. अगधीच आजारपण किंवा पती-पत्नी एकत्रिकरणाचा मुद्दा आला तर 10 वर्षानंतर जिल्हाअंतर्गत बदल्याचा विचार होईल, असे ना. सामंत यांनी सांगितले.