रत्नागिरी:-जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 393 तपासण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 1 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
नव्याने एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही. आतापर्यंत 81 हजार 931 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 97 टक्के आहे. नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 466 इतकी स्थिर आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 1 तर संस्थात्मक विलगीकरणात एकही रुग्ण नाही.