रत्नागिरी:- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह पोलिस अधीक्षक डॉ. मोहीम कुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ईंदुराणी जाखड व निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी सोमवारी कोरोनावरील लस घेतली.
जिल्ह्यात कोरोनावरील लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांना लसीकरण करण्यात आले. यानंतर महसूल कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकारी यांना लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील मुख्य अधिकाऱ्यांनी लस घेतल्यानंतर या अफवा कमी होतील अशी आशा आहे.