जिल्हाधिकारी कार्यालय कोरोनामुक्त

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वीच एका विभागातील दोन कर्मचारी पाॅझिटिव्ह आल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारनंतर अधिकारी आणि कर्मचारी अशा १३९ जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. मंगळवारी याचा अहवाल प्राप्त झाला असून, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्ह्याच्या प्रमुख प्रशासकीय कार्यालयात काही दिवसांपूर्वी दोन कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली होती.