जितेंद्र आव्हाड यांचा रत्नागिरी भाजपकडून निषेध

रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टी तर्फे जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार निषेध करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याच्या कृती विरुद्ध जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी समोर हे आंदोलन करण्यात आले.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून समस्त देशवासीयांचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध म्हणून रत्नागिरी येथे भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हा शासकीय रूग्णालय समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलना पूर्वी मा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता साळवी यांच्यासह सतेज नलावडे, दादा दळी, विक्रम जैन, राजेंद्र फाळके, संदीप सुर्वे, डॉ ऋषीकेश केळकर,अभिजीत पेडणेकर, दादा ढेकणे, राजू पाथरे, संतोष बोरकर,अनिरुद्ध फळणीकर, सुशांत पाटकर, नितीन जाधव, राजू भाटलेकर, संजय निवळकर, नंदू चव्हाण, मनोज पाटणकर, मंदार खंडकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.