‘जागतिक’ पथनाट्य स्पर्धेत परकारचे पथनाट्य दुसरे

रत्नागिरी:- जागतिक क्षयरोगदिनानिमित्त या रोगाचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अनेक जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी उपचारासाठी आपला अमुल्य वेळ द्या आणि आपले जीवन वाचवा हे ब्रिदवाक्य घेऊन जनजागृतीसाठी देशपातळीवर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशपातळीवर दुसरा क्रमांक रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परकार मेडिकल स्कुल ऑफ नर्सिंगच्या  (रत्नागिरी) द्वितीय वर्षाला असणाऱ्या
जीएनएम विद्यार्थ्यांनी मिळवला. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  


जागतिक क्षयरोग दिन म्हणून २४ मार्च हा दिवस ओळखल जातो. क्षयरोगाचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनांसह स्थानिक पातळीवर आरोग्य विभाग काम करती आहे. मात्र अनेक क्षयरुग्ण योग्य उपचार घेत नाहीत. अर्धवट उपचार सोडतात. त्यामुळे या रोगाचे उच्चाटन होत नाही. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने उपचाराला आपला वेळ द्या आणि आपले जीवन वाचवा हे ब्रिदवाक्य घेऊन पथनाट्याची जागतिक पातळीवरील स्पर्धा आयोजित केली होती. या दिनानिमित्त एल. टी. एस.जी स्कुल ऑफ नर्सिंग आणि सायन हॉस्पिटल मुंबई ह्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ई- स्ट्रीट प्ले (पथनाट्य) स्पर्धेमध्ये देशातील अनेक नर्सिंग व मेडिकल कॉलेजनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल १३ एप्रिलला जाहीर करण्यात आला. ह्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कुपर हॉस्पिटल व स्कुल ऑफ नर्सिंग मुंबई तर दुसरा क्रमांक रत्नागिरी जिल्ह्यातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परकार मेडिकल स्कुल ऑफ नर्सिंग (रत्नागिरी) द्वितीय वर्षाला
असणाऱ्या जीएनएम विद्यार्थ्यांनी मिळवला. या निमित्ताने परकार मेडिकल फाउंडेशन स्कुल व परकार हॉस्पिटल रत्नागिरीचे व्यवस्थापकिय विश्वस्त डॉ. मतिन परकरा (एम.डी. कर्डीओलॉजिस्ट ) यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.