रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास मॅक्सीमो आणि रिक्षाला भीषण अपघात झाला. रस्ता सोडून मॅक्सीमो बाहेर बांधावर धडकली. या अपघातात चारजण जखमी झाले असून रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश सखाराम कुळ्ये असे गंभीर जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जाकादेवी भातगाव मार्गावरील विल्ये येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की रिक्षाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये चारजण जखमी झाले. यापैकी एकजण गंभीर जखमी आहे. सर्वांना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे सुनील सावंत, पोलिस गायकवाड घटनास्थळी दाखल झाले.