जाकादेवी येथे दुचाकीची वृद्ध पादचाऱ्याला ठोकर

ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठ येथील रस्त्यावर ट्रिपल सीट जाणाऱ्या स्वाराने पादचाऱ्याला ठोकर दिली. या अपघातात पादचारी वृद्ध गंभीर जखमी झाला. या प्रकरणी संशयित स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल राजेंद्र जाधव (वय १९, रा. बौद्धवाडी-ओरी, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.१९) दुपारी साडेतीनच्या सुमारास निवळी ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्यावर जाकादेवी बाजारपेठ एका दुकानाच्या समोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित कुणाल जाधव हा दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएच ४८४७) घेऊन जाताना त्यांच्या मागील सीटवर रोशन विनोद मोहित (रा. काजुर्ली-बौद्धवाडी, ता. गुहागर) व जिया जितेंद्र मोहिते (रा. वरवडे, रत्नागिरी) असे ट्रिपल सीट जाकादेवी बाजारपेठेतून गणपतीपुळे दिशेकडे जात असताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून पादचारी रघुनाथ पांडूरंग खापले (वय ६३, रा. देवूड, रत्नागिरी) यांना धडक दिली. या अपघातात वृद्ध खापले याच्या डोक्याल, डावे कानाला गंभीर दुखापत होवून त्यांच्या डाव्या हाताला, पायाला,गालाला किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी विष्णू हरी घाणेकर (वय ४०, रा. देवूड, लावगणवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.