रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जांभूळफाटा येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पहलगाम निरपराध भारतीय नागरिकांना जीवे मारणार्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी भारताने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले सुरु केले आहेत. अशा स्थितीत संपूर्ण देश भारतासोबत असताना रत्नागिरी विमातळ नजिक जांभुळफाटा येथे पाकिस्तान समर्थनात घोषणा देणार्या तरुणाला लोकांनी तुडवल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.