रत्नागिरी:- जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील जांभारी येथील खाडीत आढळून आलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली आहे. रेहमुद्दीन रहीम मन्सूरी (62) असे मृताचे नाव असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
ही घटना शनिवारी 7 ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जांभारी येथील जमातवाडी येथील खाडीच्या पाण्यात तेथील नागरिकांना एका पुरुषाचा मृतदेह पाण्या तरंगताना दिसून आला होता. जयगड पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला होता. याआधी जयगड पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या रेहमुद्दीन रहीम मन्सूरी यांचाच तो मृतदेह असल्याची त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटली. मंगळवारी सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात त्यांचा मृतदेह देण्यात आला.









