Wednesday, June 10, 2026
spot_img
Home राजापूर जवाहर चौकात रहदारीस अडथळा; रिक्षावर कारवाई

जवाहर चौकात रहदारीस अडथळा; रिक्षावर कारवाई

५५ वर्षीय चालकावर गुन्हा दाखल

राजापूर:- राजापूर शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या जवाहर चौक परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास करण्यात आली.

राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई महेश बाळासाहेब जगताप हे जवाहर चौक भागात गस्तीवर असताना, त्यांना ‘न्यू रखांगी वॉच कंपनी’ या दुकानाच्या समोर एक तीन चाकी रिक्षा (क्रमांक MH 08 K 3643) उभी असल्याचे आढळले. हा परिसर अतिशय रहदारीचा असून आरोपी चालक सुरेश जानू घांगट (वय ५५, रा. हर्डी, ता. राजापूर) याने आपली रिक्षा सार्वजनिक रस्त्यावर अशा स्थितीत उभी केली होती, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता.
​रस्त्यावर रिक्षा उभी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे आणि लोकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्याचे पाहून पोलिसांनी ही कारवाई केली.

सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी दुपारी २ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपी सुरेश घांगट याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.