‘जलजीवन’च्या ठेकेदारांवर कारवाईचा फास आवळला

एक ठेकेदार काळ्या यादीत; गुहागरमधील १२ कामांचा समावेश

रत्नागिरी:- विविध कारणांमुळे अपूर्ण असलेल्या ‘जलजीवन अभियान’तील कामांची शासनस्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली गेली आहे. राज्यातील १०७ कंत्राटदारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एका ठेकेदाराचा समावेश आहे. गुहागर तालुक्यातील सुमारे १२ पाणी योजनांची कामे संबंधित ठेकेदाराने घेतलेली होती. ती अपूर्ण राहिल्यामुळे त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

‘हर घर नल से जल’ या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत जलजीवन एक ठेकेदार काळ्या यादीत मिशनमधून प्रत्येक घरात नळजोडण्या दिल्या जाणार आहेत. सप्टेंबर २०२० पासून जलजीवन अभियान राबविण्यात येत आहे. त्यातील अनेक कामे रखडलेली असून, त्याविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आवाज उठवला होता. जलजीवन अभियानातील निकृष्ट दर्जाची कामे, खोटी देयके, बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळविणे, एकाच कंत्राटदाराला अनेक गावांची कामे देणे, असे प्रकार घडले आहेत. या योजनेतील झालेल्या कामांच्या टप्प्यानुसार आणि वेळापत्रकाप्रमाणे त्रयस्थ तांत्रिक तपासणीही करण्यात आली. त्या तपासणी यंत्रणेकडून योजनेमध्ये त्रुटी आढळून आल्यावर त्यावर उपाय सुचविले आहे.

गेले. काही कंत्राटदारांना त्रुटीच्या अनुषंगाने दंडही आकारला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील सुमारे बारा कामे एकाच ठेकेदाराने घेतली होती. काही कामांना त्याने सुरुवातही केली; परंतु कालांतराने ती कामे अर्धवट ठेवण्यात आली. याबाबत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून नोटीसही दिली गेली. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर त्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गुहागरमधील संबंधित ठेकेदार परजिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली

६७ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई

जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणी योजना सुरू आहेत. त्यापैकी ४०० योजना १०० टक्के पूर्ण झाल्या आहेत. १५० योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, ४३२ योजनांचे काम सुधारित करावे लागणार आहे. आतापर्यंत मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या ६७ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.