जयगड बंदराचा विकास; जलवाहतुकीसह पर्यटनाला मोठी चालना

रत्नागिरी:- केंद्र सरकारच्या नव्या अर्थसंकल्पामध्ये जलवाहतूक वाहतुकीला मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील १२ बंदरांचा आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकास केला जाणार आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरीतील जयगड बंदरासह, डहाणूवाडवण, विजयदुर्ग बंदरांचा समाविष्ट आहे. त्यामुळे जलवाहतुकीसह पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. जयगड पोर्ट मधून कोट्यावधींचा महसुल शासनाला मिळतो. त्यामुळे जयगड येथे जलवाहतुकीसाठीचे पहिले पाऊल टाकले जाणार असून तेथे स्वतंत्र जेटी विकसित केली जाण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारच्या नव्या अर्थसंकल्पामध्ये जलवाहतूक व रस्ते वाहतुकीला मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील १२ बंदरांचा आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकास केला जाणार आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरीतील जयगड बंदरासह, डहाणूवाडवण, विजयदुर्ग बंदरांचा समाविष्ट आहे. त्यामुळे जलवाहतुकीसह पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्यातील ४८ बंदरांचा मच्छीमारी बंदर म्हणून विकास होणार आहे. तसेच मुंबई- गोवा जलवाहतुकीसाठी पॅसेंजर टर्मिनल होणार आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेअंतर्गत रो-रो सेवा सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तवसाळ ते जयगड, दाभोळ ते धोपावे, वेसवी ते बागमांडला, आगरदांडा ते दिघी येथे नव्या रो -रो सेवांबाबत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लागणाऱ्या जेटी बांधण्यासाठी ६३ कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये क्रूझ पर्यटन सेवा तसेच मुंबई ते गोवा जलवाहतुकीसाठी पॅसेंजर टर्मिनल उभारले जातील. यासाठी जोडरस्ते आणि किनारपट्टी भागात कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन विकास साधण्याचा महत्वकांक्षी निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. कोकणाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
जयगड बंदरातून वर्षाला सुमारे ३०० च्यावर छोट्या मोठी मालवाहु जहाजे येतात. त्यातुन शासनाला कोट्यावधिचा महसुल मिळतो. हे पोर्ट ट्रस्ट असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून त्याचा विकास होण्याची शक्यता कमी असून जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी स्वतंत्र जेटी विकसित होण्याची शक्यता आहे, संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.