रत्नागिरी :- जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली. मंडळाच्या अध्यक्ष पदावर बशीर होडेकर तर उपाध्यक्ष पदावर उद्योजक विवेक सुर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
तालुक्यातील जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते. ही निवडणूक शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. पंचक्रोशीतील ही निवडणूक बिनवरोध करण्यासाठी जयगड पंचक्रोशीतील प्रत्येक वाडीला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यानुसार निवडणूकीसाठी पॅनल तयार करण्यात आले. ठरलेल्या निर्णयानुसार निवडणूक बिनविरोध निवडणूक घेण्यात आली.
निवडणूक बिनविरोध करत असताना विद्यमान संचालक मंडळातील काही चेअरमन आणि सेक्रेटरी व सदस्य कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, काही नविन आणि होतकरू संचालक कमिटीत समाविष्ट करण्यात आले. त्याबरोबरच यापूर्वी पदाधिकारी असलेल्या उपाध्यक्ष सुरेश शांताराम माने यांची सभाअध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन म्हणून बशीर शेख महमद होडेकर यांची बिनवरोध फेर निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून जयगड पंचक्रोशीतील उद्योजक विवेक सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सेक्रेटरी म्हणून रविंद्र पांडुरंग पोटफोडे यांची फेर निवड करण्यात आली. सहाय्यक सेक्रेटरी मुन्ताहा महमद शरीफ टेमकर, खजिनदार पदासाठी मुकेश वामन गडदे, ट्रस्टी शराफत अ. करीम गडबडे, समाधान श्रीरंग हळदणकर, सदस्य विनोद विठ्ठल चौघुले, कृष्णा शांताराम रामाणे, कृष्णा हरिश्चंद्र परकर, असलम इस्हाक गुहागरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त संचालक मंडळाचा स्वागत समारंभ शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप वाघोदे, जेष्ठ शिक्षक मुकुंद पाटील, नंदू केदारी, माजी सरपंच अमोल बैकर, परवेझ टेमकर, माजी व्हाईस चेअरमन शरद काशिनाथ चव्हाण, सभासद दिपक पाटील, प्रकाश खेडेकर, रामनाथ आडाव, निखिल बोरकर, आण्णा झगडे, अमित गडदे, भगवान शिरधनकर, प्रसाद गुरव, दिपक भुवड, कमलाकर बोरकर, विकास पारकर, शैलेश गडदे, बंटी सुर्वे, बंड्या हळदणकर, मिलन जोग, नासिर भाई संसारे, हिदायत होडेकर, सलीम संसारे, मुश्ताक टेमकर, सत्यविजय खाडे, इनायत शिरगावकर आणि इतर माजी सभासद यांनी केले.