जमीन बिनशेतीकडे वर्ग न करता व्यापारी गाळे बांधणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला 1 लाखाचा दंड

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे जमीन बिनशेतीकडे वर्ग न करता व्यापारी गाळे बांधणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला 1 लाख 9 हजार 500 रुपये दंडाची नोटीस महसूल विभागाकडून बजावण्यात आली आहे.

सावर्डे येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत इमारत बांधताना जमीन बिनशेतीकडे वर्ग न करतात त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधून व्यवसाय सुरू केल्याबद्दल सावर्डे ग्रामपंचायत सदस्य अजित कोकाटे यांना 1 लाख 9 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोकाटे यांची बाजारपेठेमध्ये चार मजली इमारत आहे. त्यामध्ये ते व्यवसाय करतात. इमारत बांधताना ही जमीन बिनशेतीकडे वर्ग करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी तसे न करताच व्यापारी गाळे बांधून व्यवसाय सुरू केला. याबाबत अशोक काजरोलकर यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मंडळ अधिकाऱ्यांमार्फत कोकाटे यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोषी आढळल्याने कोकाटे यांना 1 लाख 9 हजार 500 रुपयांची दंडाची नोटीस बजावण्यात आली.