जनसुविधा योजनेंतर्गत जिल्ह्यात ८ कोटींची विकासकामे

रत्नागिरी:- जनसुविधा योजनेंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १४४ कामे मंजूर झाली असून ती ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आली आहेत. या सर्व कामांसाठी ७ कोटी ९७ लाख रुपये खर्च होणार आहेत.

जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषदेकडे या कामांची यादी सुपूर्द करण्यात आली. तेथून ही यादी पंचायत समितीकडे पाठविण्यात आली असून ग्रामपंचायत सर्व कामांच्या निविदा काढून या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण तालुक्यातील मौजे कौंढर ताम्हाणे ग्रामपंचायत नवीन इमारत बांधणे १५ लाख रुपये, दोणवली ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लाख रुपये , खेड तालुक्यातील बोरज निगडे ल ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लाख रुपये, चिपळूण तालुक्यातील गाणे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे १५ लाख रुपये, संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लाख रुपये, आरवली ग्रामपंचायत बांधणे १५ लाख रुपये तर राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लाख रुपये, चिपळूण तालुक्यातील अडरे महादेव मंदिर फरशी ते मधलीवाडी रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे १० लाख रुपये तसेच वेहळे खान मोहल्ला बेबल मोहल्ला येथील कब्रस्थानला कंपाऊंड वॉल बांधणे १० लाख रुपये , दहीवली मुकनाकवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख रुपये , दहीवली शिवडेवाडी ब्रीज व ग्रामदेवता मंदिर रस्त्यावर मोरी बांधणे व खडीकरण करणे १० लाख रुपये , रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले शंकर कांबळे यांच्या घरापासून गुरववाडी डोर्ले स्टँडपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १० लाख रुपये, गुहागर तालुक्यातील असोरे कुणबीवाडी सभागृह ते ग्रामपंचायत कार्यालय डांबरीकरण करणे १० लाख रुपये आणि गुहागर वेळणेश्वर गुढेकरवाडी रस्ता करणे १० लाख रुपये अशी छोटी – मोठी कामे जन सुविधा योजनेंतर्गत घेण्यात आली असून ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी सुचना दिल्या आहेत.