माजी खासदार विनायक राऊत यांचा भाजपवर घणाघात
रत्नागिरी:- भाजप राजवटीकडून सर्वांची फसवणूक होत असल्याने जनतेत प्रचंड आक्रोश आहे. त्याला साथ देण्यासाठी व गद्दारांना गाडण्यासाठी येतील ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कोकणात येणार आहेत. कोकणी माणूस आणि उद्धव ठाकरे, मातोश्री यांचं नातं कोंबडीवड्यावर नाही असा टोला शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यानी लगावला.
राऊत शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडून एसटी कामगार, लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू आहे. पीक विमा कंपन्यांचा भरघोस फायदा करून देण्याचं काम हे सरकार करत आहे. या सर्वांविरोधात जनतेचा आक्रोश मोठा आहे. त्याला साथ देण्यासाठी ठाकरे येणार आहेत. खासदार नारायण होणाऱ्या टिकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, राणे यांच्या बुद्धीची नेहमी कीव येते, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. कारण ते उतारवयात आहेत.
महावितरणकडून वीजग्राहकांना प्रीपेड मीटर बसविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही रत्नागिरीत प्रीपेड मीटर लावू देणार नाही. ग्राहकांकडे प्रीपेड मीटरची बसवल्यास तेव्हा आम्ही त्याची होळी करू असा इशारा राऊत यांनी दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे
महाराष्ट्रातील ड्रग माफियांचा अड्डा बनलेले दोन जिल्हे असून ड्रग माफिया शासनकर्त्यांच्या आशीर्वादाने ड्रगचा व्यवसाय करतात. त्यांना शासनाचा आशीर्वाद असल्यामुळे पोलीस कारवाई करत नाही.
काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांच्या ठाकरे सेनेतील झालेल्या पक्षप्रवेशाबाबत विरोधी शिवसेना पक्षाकडून दीका करण्यात आली. पण आम्हाला बाजारात विकत घेऊन पक्षाचे पदाधिकारी घ्यायचे नाही आहेत. बेटकर स्वतःच्या मनाने आमच्या पक्षात आले आहेत. त्यांना कोणत्याही आमिष दाखवलं नाही. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी ते आलेले आहेत. तिकडे आत्ताचे जे काही पक्ष प्रवेश होत आहेत, पाच पंधरा लाख घ्या माझ्याकडे या पंधरा लाख सांगायचे आणि ५० हजार द्यायचे, आणि पक्षप्रवेश करून घ्यायचा नंतर तोंडाला पाने फुसायची, अशी टीका यावेळी राऊत यांनी केली.
मत्स्य व बंदर मंत्री नीतेश राणे यानी फक्त स्वप्ने पाहात राहावीत. त्यांना बेडूक उड्या मारण्याची फक्त सवय असल्याची टीका राऊत यांनी केली. त्यामुळे आम्ही त्यांना फार किंमत देत नाही. यां गर्विष्ठ मंत्र्याला धडा शिकविण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. नीतेश राणे यांना अपात्र करा म्हणून राज्यपालांकडे अपील केलं आहे, ते जर झालं नाही तर पुढच्या १५ दिवसांत हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.