ना. उदय सामंत: राज्यातील सर्वात उंच पुतळा,
रत्नागिरी:- राज्यातील सर्वाधिक उंच असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन रविवारी थिबापॉईंट येथील राजमाता जिजामाता उद्यानात होत असून, महाराजांना अभिवादन करण्यासाठी रत्नागिरीवासियांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
4 व 5 तारखेला रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये वाढ करणार्या दोन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरणानंतर स्वप्नील बांदोडकर यांचा कार्यक्रम होणार आहे. जिजामाता उद्यानात सर्व नागरिकांना पुढील तीन दिवस मोफत एंट्री असणार आहे. त्यानंतर नियमित तिकीट दरात प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी राजमाता जिजामाता व बाल शिवाजी राजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
सोमवार 5 तारखेला सायं 6 वा. विठ्ठलाच्या मूर्तीचे ÷उद्घाटन होणार आहे. यावेळी मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर दिंडी निघणार आहे. पंढरपूरवारीतील अश्व, बैलगाडीही यात सहभागी होणार आहे. या दिंडी सोहळ्या दरम्यान उभे रिंगण घातले जाणार असून, याठिकाणी पाच हजार वारकरी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर दोन प्रसिध्द किर्तनकारांचे कार्यक्रम होणार आहेत.
याच दरम्यान रत्नागिरी शहरात वारकरी साहित्य संमेलन स्वयंवर मध्ये आयोजित करण्यात आले असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीतील मालगुंड येथील प्राणी संग्राहालयाच्या संरक्षण भिंतीसाठी 10 कोटीचा निधी मंजूर झाला असून एमआयडीसीकडून हा खर्च केला जाणार असून, या फाईलवर आपण स्वाक्षरी केल्याचेही त्यांनी सांगितले. थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमेडिया शोचे कामे सुरु असून 25 कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पर्यटन विकासानंतर कोकणात पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.