Thursday, June 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी चौगले लावगण शिप रिपेअर कंपनीत शॉक लागून कामगाराचा मृत्यू

चौगले लावगण शिप रिपेअर कंपनीत शॉक लागून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लिमिटेड या कंपनीत स्टार्ट बोर्डच्या इंजिनवरील पंप रुममधील मोटार दुरुस्तीचे काम करताना कामगाराला शॉक लागला. उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सुदिपकुमार सुरेश सिंह (वय २७, रा. हिरापाकडटोला, मंगरहा, मानिकपूर, गोपलगंज बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी पावणे एकच्या सुमारास खंडाळा आरोग्य केंद्रात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदिपकुमार सिंह हे चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये बर्थ नं -४ वरती शांतीसागर १७ या जहाजावर इलेक्ट्रोमेंट इंजिनिअरिग वर्कस या कंपनीमार्फत जहाजाचे इंजिन रुममधील स्टार बोर्डच्या इंजिवरील पंप रुपमधील मोटार दुरुस्तीचे काम करत असताना शॉक लागून बेशुद्ध पडले. त्यांना इतर कामगारांच्या मदतीने जहाजावरुन बाहेर काढून कंपनीतील रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.