चिपळूण:- चिपळूण कराड रस्त्यावर पिंपळी येथे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघात प्रकरणी फरार दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात एका दुचाकी वरील बाजीराव भाऊ कांबळे 57 अलोरे कॉलनी हे जखमी झाले आहेत. ते आपल्या ॲक्टिव्हावरून चिपळूण कराड रस्त्यावर जात असताना हुंडा कंपनीच्या हॉर्नेट दुचाकी स्वाराने त्यांना धडक दिली. या त्यांच्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर हॉर्नेट चालक पळून गेला. या अपघाताची खबर बाजीराव कांबळे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिले त्यानुसार फरार हॉर्नेट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.