चिपळूण मार्कंडीतील तरुणाची आत्महत्या

चिपळूण:- शहरातील मार्कंडी येथील रहिवासी असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शुभम रवींद्र सावर्डेकर (२३, मार्कंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सावर्डेकर कुटुंब हे अनेक वर्षांपासून शहरातील मार्कडी येथे वास्तव्यास आहेत. शुभम हा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होता. असे असताना त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. शुभम याचे वडील रवींद्र सावर्डेकर हे कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी गेले होते. शुभम यांने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते मात्र स्पष्ट झालेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.