चिपळूण:- दुकानात गृहोपयोगी वस्तू आणण्यासाठी जात असलेल्या मुलाला भरधाव मॅजिक कारने जोरदार धडक दिली. या धडकेत 9 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना कळंबस्ते, चिपळूण येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय धरम सिंग (9, रा. कळंबस्ते) हा इलेक्ट्रीकल अॅण्ड जनरल स्टोअर्समध्ये गृहोपयोगी वस्तू आणण्यासाठी गेला होता. याचवेळी कळंबस्ते ते आंबडस रोडवरून जाणार्या भरधाव मॅजिक कारने धनंजय सिंग या मुलाला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अज्ञात वाहनचालकावर भादविकलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.