चिपळूणात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघेजण जखमी

चिपळूण:- तालुक्यातील गाणे खडपोली येथील कंपनीसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून दोघेजण जखमी झाले. ही घटना ५ ऑगस्ट रोजी २.४५ वा. च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरुन ३ सीट नेणाऱ्या स्वारावर अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बळीराम जाधव ( ५०, कादवड चिपळूण ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जाधव हे आपल्या ताब्यातील दुचाकी वरुन ३ सीट घेवून चिपळूण ते तिवरे असे जात होते . यावेळी पिंपळी बाजूच्या देशेने येणाऱ्या दुचाकीला त्यांनी जोरदार धडक दिली . या धडकेत संजय लक्ष्मण घाडगे ( काविळतळी , चिपळूण ) यांना जबर दुखापत झाली . तसेच स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुनील जाधव याच्यावर भादविकलम २७९ , ३३७ , ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ , १२८ / १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .