चिपळूणमध्ये आयशरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे वरचीवाडी येथे ०८ मे सकाळी साडेनऊच्या सुमारास आयशर ट्रकने धडक दिल्याने वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मधुकर गोरीवले (वय ३८ वर्षे) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील मधुकर नारायण गोरीवले (वय ६२ वर्षे, रा. वालोपे, वरचीवाडी, चिपळूण) हे एकादशीनिमित्त वालोपे येथील झोलाई मंदिरात निघाले होते. सकाळी सुमारे ९.३५ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे वरचीवाडी येथे आरोपी नामदेव गोविंद गायकवाड (रा. कोलाड, वरसर्गाव, ता. रोहा, जि. रायगड) याच्या मालकीच्या एम. एच ०८ डब्ल्य २६७७ क्रमांकाच्या आयशर कंपनीच्या माजदा गाडीने निष्काळजीपणे रिव्हर्स घेत असताना मधुकर गोरीवले यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मधुकर गोरीवले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सायंकाळी ४.५८ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामदेव गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ) आणि १२५ (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.