चिपळुणात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

चिपळूण:- नैराश्येपोटी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल दत्ताराम पंडव (३०, पोफळी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर जितेंद्र नारायण पंडव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल याचे २ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. तिथपासून तो दारुच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. असे असताना नैराश्येपोटी त्याने राहत्या घराच्या बेडरूममधील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.