चिपळुणातील अपघातात दुचाकीस्वार जखमी

चिपळूण:- शहर बाजारपेठेतील गांधी चौक येथे दुचाकीला कारने धडक देऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी कार चालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. यात एक तरुण जखमी झाला आहे. दीपक लक्ष्मण जोशी (रावतळे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. विजय प्रकाश सपकाळ (३५, बहादूरशेख नाका) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा त्याच्या मित्राच्या दुचाकीवरुन बहादूरशेख नाका ते चिपळूण बाजापेठ असा जात होता. यावेळी तो बाजारपेठेतील गांधी चौक येथे आला असता त्याचवेळी दीपक जोशी याने त्याच्या ताब्यातील कारविरुद्ध दिशेने आणून दुचाकीला धडक दिली. यात विजय व त्याचा मित्र उजव्या बाजूला पडले. तसेच यात विजयच्या पायाला दुखापत झाली. या अपघातप्रकरणी दीपक याच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.