रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या थिवीम ते हजरत निजामुद्दीन रेल्वेन प्रवास करणारा प्रवासी निवसर स्टेशन येथे उतरुन चिंद्रवली पऱ्याने चालत जाताना घसरुन पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धन दामर चेत्री (वय ३३, रा. गाव कलका, पोस्ट-लकला, जि. तिनसुळिया राज्य आसाम) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या पुर्वी प्रकाश जोशी यांच्या काजूच्या बागेजवळ असलेल्या पऱ्यात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धन चेत्री हा रेल्वे स्टेशन निवसर येथे उतरुन चिंद्रवली पऱ्यातून जात असताना घसरुन पडला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









