रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी चायनिजच्या सेंटरमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सालीक कामिल फणसोपकर (२४, रा. कोकणनगर जामा मशिद, मजगाव रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) शिवाजीनगर येथील चायनिज गाडीवर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चायनिजच्या गाडी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.