रत्नागिरी:- तालुक्यातील चाफेरी येथे कामाच्या ठिकाणी हजर असलेल्या कोल्हापूर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. युवराज रामनाथ खोत (५०, रा. खोतवाडी हातकणंगले, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.३०) सकाळी नऊच्यासुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार युवराज खोत यांना बुधवारी (ता. २९) फिट आल्याने त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बरे वाटल्याने दूसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ३०) ते चाफेरी येथील कामाच्या ठिकाणी हजर होते. ते त्याच ठिकाणी रहात असलेल्या शेडच्या बाहेर बसलेले असताना त्यांच्या नाकातून रक्त आल्याने व ते कोणतीही हालचाल करत नसल्याने खबर देणार सुजित पाटीलने इतर कामगारांच्या मदतीने युवराज खोत यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









