रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी गावाकडे चाकरमान्यांची रेलचेल सुरू झालेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱया या चाकरमान्यांना डेंग्यूसह ताप, डोळे येणे या आजारांच्या पार्श्वभूमीवर खबरदार करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सतर्प झालेला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महामार्ग तसेच 23 ठिकाणी आरोग्य पथके तैनात झालेली आहेत.
गणेशोत्सव काळात साथीच्या आजारांचा परगावाहून येणाऱया चाकरमान्यांच्या आगमनामुळे फैलाव होण्याची शक्यता अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर गावाकडे येणाऱया चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्यासाठी जिल्ह्dयात आज 16 सप्टेंबरपासून आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामांर्पत गावी येणाऱया नागरिकांची तपासणी आरोग्य तपासणी सुरू झालेली आहे. सद्या मुंबईत मोठ्या प्रमाणात डेंगू, डोळे येणे असे रुग्ण आढळत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गावी येणाऱया नागरिकांमुळे आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्याद्वारे चाकरमान्यांची तपासणी व त्यांना पतिबंधात्मक उपचार, तसेच खबरदारी विषयी मागदर्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱयांमार्पत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात ताप, काविळ, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया रुग्ण आढळल्यास औषधोपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महामार्गावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहेत. तसेच गणेशभक्तांना वैद्यकीय सेवेची कुठेही कमतरता भासणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात येउन औषधांचा साठाही पुरेसा ठेवला जाणार आहे.









