चर्मालय येथे पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून पादचाऱ्याला ठोकर दिली. या प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफवान जिकीर बोरकर (वय २६, रा. ग्रीन पार्क चौक, कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) रात्री आठच्या सुमारास चर्मालय नाका रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सफवान हा दुचाकी (क्र. एमएच-०८ बीडी ४७०६) ही घेऊन मजगाव ते चर्मालय असा जात असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून पादचारी रामनिहोर छोटेलाल पटेल (वय ४०, रा. चर्मालय, रत्नागिरी मुळ ः रायपूर जि. रिवा, मध्यप्रदेश) याला ठोकर दिली. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले व स्वतःही जखमी झाला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.