रत्नागिरी :- चक्रीवादळ मुंबईकडे जाईल असा हवामान खात्याचा अंदाज होता मात्र त्याने आता दिशा बदलली आहे. हे वादळ मुंबई कडे न जाता दापोली केळशी बंदरातून अरबी समुद्रात प्रवेश करेल. त्याच्या संभाव्य मार्गात येणाऱ्या सर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस पडणार आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुरुवारी पहाटे पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. किनारपट्टी भागात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसासोबत वेगवान वारे देखील वाहत आहेत. अनेक भागात वीज गायब झाली असून उद्या सकाळ पर्यंत पावसाचा आणि वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.









