रत्नागिरी:- शहरातील आर.टी.ओ ऑफीस जवळील सोसायटीमध्ये चक्कर येउन पडलेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.घडली.
आनंद श्रीपाद घोलकर (84, रा.अष्टविनायक सोसायटी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 7.45 वा. घरी नाष्टा केल्यानंतर त्यांनी नेहमीच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर काहीवेळाने ते आंघोळ करुन बेडरुममध्ये आले असता त्यांना चक्कर आली व त्यांना बोलायला जमत नव्हते म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









