चक्कर येऊन किचन कट्ट्यावर आपटलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकणनगर येथील तरुणाला फिट आल्याने तो किचन कट्यावर आपटला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जावेद शौकत बंदगी (वय ३४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १८ ऑक्टोबरला सकाळी दहाच्या सुमारास कोकणनगर येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जावेद घरात असताना त्यांना अचानक फिट आली आणि ते किचन कट्यावर आपटून जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.