घरगुती वादातून कुवारबाव येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- घरगुती वादातून तरुणाने राहत्या घरी छताच्या फॅनला दुपट्टयाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार 8 जून रोजी रात्री 10.30 वा.सुमारास कुवारबाव येथील लक्ष्मीकेशवनगर येथे घडली.

विवेकानंद विलास सावंत (38, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत याच्या पत्न्ाीवर उपचार सुरु असल्याने डॉक्टरांनी तिला कोणतेही काम करण्यास ताणतणाव घेण्यास नकार दिला होता. परंतू पत्नी कोणतेही काम करत नसल्याने मयत पती आणि पत्नी यांच्यात अधूनमधून वाद-विवाद होत असत. रविवार 8 जून रोजी रात्री 8 वा. सुमारास त्यांच्यात याच कारणातून वाद झाला. तेव्हा पती विवेकानंद सावंत याने पत्नीला घराबाहेर काढून दरवाजा बंद केला. म्हणून पत्नीने 112 वर कॉल करुन पोलिसांना बोलावून घेतले.

पोलिसांनी सोसायटीमधील इतर लोकांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता त्यांना विवेकानंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.