पालिकेचा निर्णय; घनकचरा, बायोगॅस, मैला, प्लास्टिक प्रकल्प एकत्रित होणार
रत्नागिरी:- शहराच्या विस्तारिकरणाचा भविष्यातील 30 वर्षांचा विचार करून उभारल्या जाणार्या दांडे आडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा रिव्हाईज प्लॅन (फेर आराखडा) करावा लागणार आहे. मात्र एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने पालिकेने फेर आराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला. पहिला आराखडा सुमारे 15 कोटी घनकचरा प्रकल्पाचा होता.
शहराजवळील दांडेआडोम येथे सुमारे 15 कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता. सुमारे अडीच हेक्टर जागेवर हा प्रकल्प असून कचर्यावर 100 टक्के प्रक्रिया होणार आहे. यावर बायोगॅस प्रकल्प, वीज प्रकल्प, खत प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा यापूर्वी पालिकेने केला आहे. त्याचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा 1 कोटी 65 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मैला प्रकल, प्लास्टिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी सर्वकाही करण्यचा पालिकेचा विचार आहे. शहरापासून काही किमी लांब असल्याने त्याचा विचार करून फेर आराखडा तयाार केला जाणरा आहे.
स्वच्छ भारत अभियानात केंद्राचे बक्षिस मिळविणार्या पालिकांपैकी रत्नागिरी पालिका ही एक आहे. मात्र पालिकेची पडकी बाजू राहाते की स्वतःच्या घनकचरा प्रकल्प नव्हता. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापुर्वीपासून पालिका घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील होती. शहराजवळपासच्या अनेक जागा निश्चित केल्या. मात्र त्याला विरोध झाला. अखेर दांडेआडोम येथील जगा निश्चित केली. पालिकेने तेथे घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला. मात्र दांडेआडोम येथील ग्रामस्थानी त्याला विरोध केला. ते पालिकेविरोधात न्यायालयात गेले. अनेक वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पालिकेच्याबाजूने निकाल दिला. त्यामुळे घनकचरा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला. शहरात सुमारे 22 टन कचरा दरदिवशी गोळा होतो. या कचर्यावर या घनकचरा प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. 100 टक्के कचर्यावर प्रक्रिया करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. कचरा डम करून (गोळा करून) ठेवला न जाता त्यावर थेट प्रक्रिया केली जाणार आहे.प्लास्टिकवर प्रक्रिया करून ते सिमेंट कंपनीला दिले जाणार आहे. वैद्यकीय कचर्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असा पालिकेचा दावा आहे. अधुनिकतेची जोड देत हा फेर आराखडा तयार केला जाणार आहे.