रत्नागिरी:- ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच लांजा तालुक्यातील भडे गावाचा सर्वांगीण विकासासाठी येथील गावकर्यांनी एकजुट दाखवली. त्यामुळेच ग्रामपंचायत भडे यांची ‘आदर्श गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेस डॉ. पद्मश्री पोपटराव पवार, आदर्श सरपंच हिवरे बाजार जि. अहमदनगर यांनी भडे प्राथमिक आदर्शगाव घोषित केला.
महाराष्ट्र राज्य कृषि विभाग अंतर्गत आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य पुणे मार्पत मौजे भडे ता. लांजा जि. रत्नागिरी विशेष ग्रामसभा गावभेट कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. या सभेचे अध्यक्ष सुरेश भालेराव कृषी उपसंचालक, आदर्शगाव यांचे मार्गदर्शन खाली ही विशेष ग्रामसभा चालविण्यात आली. ग्रामसभा (चराईबंदी, कुहाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, श्रमदान, बोअरबंदी, लोटाबंदी) या सप्तसुत्री च्या माध्यमातून आदर्शगाव निवडणेत आले.
विशेष ग्रामसभेमध्ये वय वर्ष 7 ते 80 वर्षापर्यंत विद्यार्थी, कॉलेज कुमार- कुमारी, महिला, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, वृद्ध नागरीक यांचेशी चर्चा व प्रश्न उत्तरे करून ग्रामसभा चालविण्यात आली. प्रथमत: भडे गावांतून लेझीम पथकासह तसेच लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता अशा प्रकारे छोटी रॅली आयोजित करणेत आली होती. तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. रॅली व कार्यक्रमांचे आयोजन भडे गावचे ग्रामस्थ व अनुसया महिला स्वयंसेवी संस्था, रत्नागिरी यांनी केले होते. हा कार्यक्रम आदर्श शाळा नं. 1 येथे नुकताच पार पडला.
या विशेष ग्रामसभेस डॉ. पद्मश्री पोपटराव पवार, आदर्श सरपंच हिवरे बाजार जि. अहमदनगर हे काही कार्यालयीन कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. परंतू ग्रामसभेमध्ये त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थांना मार्गदर्शन करून ग्रामसभा उत्तम झाली. तसेच भडे गावातील ग्रामस्थांचे कौतुक करून भडे प्राथमिक आदर्शगाव घोषित केला व पुढील कामे सुरू करा असे आदेशीत केले.
या सभेला श्रीम. वैशाली माने प्रांताधिकारी लांजा, राजापूर श्रीमती नाईकनवरे उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी, सहा. गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, मंडळ कृषी अधिकारी गुरव, कृषी पर्यवेक्षक शांताराम कांबळे तसेच सौ. सदिच्छा नवाथे (सरपंच), सौ. संजना बंडबे (उपसरपंच), राजेंद्र दळवी, मंगेश खर्डे, ज्ञानेश रेवाळे, सुहासिनी लोखंडे, ग्रामसेवक एल. एस. महाजन, अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष श्रीम. नीलम पालव, तांत्रिक सल्लागार संदीप डोंगरे, तसेच जेष्ठ ग्रामस्थ मुंबई चंद्रकांत जाधव, भरणकर, माजी सरपंच सुधीर तेंडूलकर, माजी सरपंच सौ. आडविलकर, भरतकुमार राऊत हे उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन वाडेकर यांनी तर आभार सरपंच नवाथे यांनी केले.