ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन सादर करण्याच्या मुदतीत दोन तासांनी वाढ

रत्नागिरी:- ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाआॕनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 20 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11 ते दु. 3 वा. पर्यंतची वेळ सायं. 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या बाबतचे लेखी आदेश प्रशासनाने तहसीलदार मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर यांना पाठवले आहेत. राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीव्दारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून, दिनांक 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिनांक 16 ऑक्टोबर पासून संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाआॕनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 20 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11 ते दु. 3 वा. पर्यंतची वेळ सायं. 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे.