गोळप येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

पावस:- तालुक्यातील गोळप येथे खाऊसाठी दिलेल्या पैशांवरुन भावासोबत वाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला. मुलाच्या वडिलांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

निरज कुमार राजेंद्र चौधरी (१४, रा. गोळप, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत अल्पवयीन मुलाचे वडिल राजेंद्र शिवजतन चौधरी (४४, मुळ रा. बिहार सध्या रा. गोळप, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

त्यानुसार, राजेंद्र चौधरी यांनी शिमगोत्सवानिमित्त निरज आणि विपूल या आपल्या दोन मुलांना खाऊसाठी पैसे दिले होते. या पैशांवरुनच निरज कुमार आणि विपूल या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे निरज कुमार घरात कोणालाही न सांगता निघून गेला. ही बाबत राजेंद्र चौधरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आजुबाजुला तसेच नातेवाईक व मित्र यांच्याकडे निरज कुमारचा शोध घेतला. परंतू, तो मिळून न आल्याने त्यांनी मंगळवारी (ता.२६) ला पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली.