गोगटे कॉलेज नजीक इलेक्ट्रीक करंट लागून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- स्टील कटींगने वायडींग वायर कंटींग करत असताना इलेक्ट्रीक करंट पायाला लागून कामगार बेशुद्ध पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रामचंद्र गयाप्रसाद पासवन (वय २७, रा. सध्या महिला वसतीगृह, गोगटे कॉलेजजवळ, रत्नागिरी.मुळ ः नरैया ता. बिंदकी, जि. फत्तेपूर राज्य उत्तरप्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३१) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार कुंदन उत्तम मगर (वय ४०) हे सिव्हील इंजिनिअर असून हे कौलगुट कन्स्ट्रक्शन मिरज या कन्स्ट्रकशन कंपनीमध्ये साईट सिव्हील इंजिनअर या पदावर काम करत आहेत. जून २०२४ पासून गोगटे कॉलेज रत्नागिरी येथील आवारातील इमारतीचे बांधकाम सुरु आहे. रामचंद्र पासवन हा इतर कामगारांसमवेत स्टील कटींग मशिनने वायडींग वायर कटिंग करत अशताना त्याला इलेक्ट्रीक कंरट पायाला लागून बेशुद्ध पडला. खबर देणार कुंदन मगर यांनी तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.