रत्नागिरी:- येथील गोगटे जोगळेकर कॉलेज आवारात दोन भले मोठे अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. महाविद्यालयीन कर्मचारी नामदेव सुवरे यांना कॉलेज आवारातील गटारात दोन अजगर आढळून आल्यावर त्यांनी याची माहिती सर्पमित्रांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होतं दोन्ही अजगरांना पकडले.
दरम्यान, कॉलेज आवारात अजगर असल्याचे कळल्यावर नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. सर्पमित्र या अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. सध्या कोरोना निर्बंध असल्याने कॉलेज आवारात विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा वावर कमी आहे. त्यामुळे हे अजगर गटारमार्गे भर नागरी कॉलेज वस्तीत असलेल्या कॉलेज आवारात शिरले असावेत, असे सांगण्यात आले.