गॅसच्या टँकरची धडक बसून पाच वाहनांचे नुकसान

साखरपा:- रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेतील पुलावर गॅस टँकरचा अपघात झाला. गॅसच्या टँकरने ट्रकला धडक दिल्याने त्यामागे असणाऱ्या तब्बल पाच वाहनांचे नुकसान झाले.

कोल्हापूरच्या दिशेने जाणारा एचपी गॅसचा टँकर दाभोळे येथे आला असता समोरून येणाऱ्या पुणे ते लांजा असे जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने ट्रक पाठीमागे सरकला त्याचबरोबर पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना ठोकत गेल्याने चार वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी वाहतूक पोलीस व साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे वैभव कांबळे, तानाजी पाटील घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व अपघात घटनेची कार्यवाही सुरू केली आहे, वाहनधारकांची नावे समजू शकली नाहीत.