गृहविलगिकरणात असणाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेची टेलिफोनिक ओपीडी; संशयित रुग्णांच्या शंकांचे होणार समाधान

रत्नागिरी:- कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्यांना घरच्या घरी विलिगिकरणात ठेवले जात आहे. काही जण स्वतः हुन विलिगिकरण करून घेत आहेत. अनेकदा अशा रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्ण देखील कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी फार घाबरतात. अशा रुग्णांसाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग टेलिफोनिक ओपीडी सेवा घेऊन आली आहे.

टेलिफोनिक ओपीडी सेवेेत फोन करा आणि आपले प्रश्न विचारा अगदी ताप सर्दी खोकला पासून ते डोकेदुखी पर्यंत. कोरोनाच्या लक्षणा विषयी काही शंका असल्यास अशा शंकांचे तत्काळ तज्ज्ञ मंडळींकडून समाधान केले जाणार आहे. 02352- 225403/ 226403/ 227403 आणि 8669187492/ 8668229856 या दूरध्वनी, मोबाईल क्रमांकावर लोक आपले प्रश्न विचारू शकतात.