रत्नागिरी:- गुरुपौर्णिमेला तालुक्यातील नाणीज धाम येथे गेलेली वृद्ध महिला आजारी पडली. उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. अनिता गोपीनाथ मडके (वय ५९, रा. जगताप बिल्डींग ता. हवेली, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.१०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय पाली येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिता मडके या सत्संग समुहाच्या महिलांमधून गुरुपौर्णिमेला नाणीज संस्थामध्ये आल्या होत्या त्यांना अचानक उलट्या, मळमळणे व जुलाब सुरु झाले अशक्तपणा येवून आजारी पडल्याने त्यांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.