रत्नागिरी:- अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी कार्यालयामार्फत शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला इत्यादी प्रतिबंधित पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. रत्नागिरीतील कारवाईत 34,457 आणि चिपळूणातील कारवाईत 28,910 असा 63,367 रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये दि.4 मार्च रोजी रत्नागिरी शहरातील सुनिल दत्तात्रय लिंगायत, में लिंगायत पान शॉप, साळवीस्टॉप, रत्नागिरी, प्रमोद रामचंद्र कळंबटे, मे कळबटे पान शॉप, साळवी स्टॉप, रत्नागिरी, अब्दुला यारमोहम्मद खान, मजगाव रोड, रत्नागिरी, विश्वास दिनकर गांधी, में रसदा पानशॉप, मारुती मंदिर, रत्नागिरी, शिवराम सिताराम टिळेकर, मे. महाराष्ट्र पानशॉप, मारुतीमंदिर, रत्नागिरी, अजय अविनाश घडशी, में महादेव पान सम्राट, आठवडाबाजार, रत्नागिरी, प्रितम उदय कदम, मजगाव रोड, रत्नागिरी याच्याकडून एकूण 34,450 रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला इत्यादीचा साठा जात करून या सातही पेटीना सील करण्यात आले आहे.
त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला असून या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याचप्रमाणे दि 1 मार्च रोजी चिपळूण रोथील सुरेश गुरुलिगम जगम, रा.शिव दिक्षा बिल्डींग, पिपळी खुर्द, ता चिपकूण, जि. रत्नागिरी यांच्या राहत्या घरामधून 28,910 रूपये किमतीचा गुटखा, पानमसाला इत्यादीचा साठा जप्त करुन या पेढीला सील करण्यात आले त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस स्टेशन येथे प्रथम खतरी अहवाल नोंदवण्यात आला असून या प्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त अन्न, रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली अन सुरक्षा अधिकारी दशरथ कांबळे, प्रशांत गुंजाळ, विजय पाचपुते यांनी घेतली.









