पावस:- गावखडी- समुद्रकिनारी सुरुबनातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक यशवंत सुतार (वय ६४, रा. पड्यारवाडी-गावखडी, रत्नागिरी) असे मद्यपान करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) दुपारी एकच्या सुमारास गावखडी समुद्र किनारी सुरुबन येथील झाडाच्या आडोशाला निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबक मौळे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









