रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी येथील आंबेरे खाडीत मासेमारी करत असताना होडी उलटून मच्छिमार पाण्यात बुडाला. ही घटना रविवार 30 नोव्हेंबर रोजी कालावधीत घडली. त्यांचा मृतदेह सकाळी जेटीनजीक आढळून आला.
अस्लम युनुस पेजे (रा. गावखडी, रत्नागिरी ) असे बुडालेल्या मच्छिमाराचे नाव आहे. रविवारी सायंकाळी अस्लम युनुस पेजे हे आपली छोटी होडी घेऊन आंबेरे खाडीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. अचानकपणे त्यांची होडी उलटून ते पाण्यात दिसेनासे झाले. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी पूर्णगड पोलिसांना याची माहिती दिली. सोमवारी सकाळी मुस्लीम मोहल्ला जेटी येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.









