प्रेक्षकांकडून फसवणूक झाल्याची भावना
रत्नागिरी:- लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायन मैफिलीचा रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावरती होणारा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाल्यानं, तसंच याची कल्पना दिली न गेल्यानं प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय.
रविवारी संध्याकाळी गायक महेश काळे यांच्या गायन मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावरती सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार होता मात्र कार्यक्रम रद्द झाल्याचं बाहेरून येणाऱ्या रसिकांना थेट रत्नागिरीत आल्यावरच कळल्यानं प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळं अनेकांचा हिरमोड झाला आहे तर अनेकांची आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
याबाबतची तिकीट विक्री स्थानिक पातळीवर तसंच बुक माय शो वर करण्यात आली होती. रत्नागिरीच्या बाहेरून अगदी कोल्हापूर पासून रसिक प्रेक्षक महेश काळे यांच्या गायन कार्यक्रमासाठी आले होते या सगळ्यांनी तिकीट विकत घेतली होती. मात्र रत्नागिरीत आल्यावरच हा कार्यक्रम रद्द झाल्याच्या कळल्यानं अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला .
पुण्याचे गंधार जोग दिवेश बापट यांच्या एकदंत थिएटर आणि ताल इंटरटेनमेंट यांनी हा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित केला होता. पुण्यातील गंगाधर जोग व दिवेश बापट यांच्या सांगण्यानुसार हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती आम्ही पाच दिवसांपूर्वीच कळवली होती मात्र बुक माय शो यांनाही ही माहिती देण्यात आली होती मात्र तरी बुक माय शो वाल्यांनी आदल्या दिवशीपर्यंत तिकीट विक्री केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
या कार्यक्रमासाठी ५०० रुपये पासून अगदी ३५०० रुपये पर्यंत रसिक प्रेक्षकांसाठी तिकिटाचे दर ठेवण्यात आले होते. बुक माय शो वाल्यांकडे तिकीट बुकिंगचे पैसेही जमा झाले मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम रद्द झाला. दरम्यान, आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण मात्र नेमकं समजू शकलं नाही.
शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावर हा कार्यक्रम होणार होता तर या ठिकाणी प्रमाणावर स्टेड पेंडाल वगैरे किंवा रोषणाई किंवा कार्यक्रमाचे पोलीस परवानगी घेऊन सगळं करण्यात आलं असतं, मात्र यातलं काहीच घडलं नव्हतं. आता या सगळ्या प्रकारासंदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मनस्ताप व फसवणूक झाल्याचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत .









